Mutual Fund: 1 कोटी SIP नंतरही श्रीमंत का वाटत नाही? महागाईचा खरा प्रभाव समजून घ्या

Mutual Fund SIP: अनेक वर्षांपासून एक साधा सल्ला दिला जातो — “दर महिन्याला SIP सुरू करा आणि 20 वर्षे थांबा… ₹1 कोटी तयार होतील.” हे वाक्य चुकीचं नाही. पण पूर्ण सत्य देखील नाही.

गुंतवणूकदारांना आकड्यांमध्ये यश दिसतं, पण संपत्तीत समाधान नाही वाटत — याचं कारण रिटर्न नसून खरेदीशक्ती (Purchasing Power) आहे. वेळ जसजसा पुढे जातो तसं पैशाची किंमत कमी होत जाते, आणि इथेच बहुतेक लोकांचा अंदाज चुकतो.

एक साधं उदाहरण

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा ₹10,000 SIP सुरू केली. कालावधी 20 वर्षे आणि अपेक्षित परतावा 12%. या गणनेनुसार अंतिम रक्कम साधारण ₹1 कोटी होते. कागदावर पाहिलं तर हे उत्तम वाटतं — एक मोठं लक्ष्य पूर्ण झाल्यासारखं. पण इथे एक महत्त्वाचा घटक लक्षात घेतला जात नाही — महागाई.

जर सरासरी महागाई दर 6% धरला, तर 20 वर्षांनंतरच्या ₹1 कोटींची आजच्या पैशात किंमत साधारण ₹30–32 लाखांइतकीच राहते. म्हणजे आकडा मोठा असला तरी जीवनशैलीत फारसा फरक पडत नाही. कारण हातात रक्कम कमी येते. आणि 20 वर्षानंतर महागाई वाढली असेल.

चूक SIP मध्ये नाही — पद्धतीमध्ये आहे

SIP चुकीची नाही. SIP ची रक्कम ही खरी समस्या आहे. ते कस काय? बहुतेक लोकांचा पगार दरवर्षी वाढतो, खर्च वाढतो, जीवनशैली बदलते — पण गुंतवणूक मात्र तशीच राहते. पहिल्या वर्षी ₹10,000 योग्य वाटतात, पण 10 वर्षांनंतरही तेवढीच SIP ठेवली तर गुंतवणूक प्रत्यक्षात कमी होत जाते.

कारण महागाई प्रत्येक वर्षी तुमची गुंतवणूक “लहान” करत असते. तेही तुमच्या नकळत. म्हणून SIP रक्कम वाढविणे खूप गरजेच आहे.

अधिक प्रभावी मार्ग — Step-Up SIP करणे.

दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा खरा मार्ग म्हणजे SIP वाढवत नेणे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरवर्षी SIP 10–15% ने वाढवली, तर परिणाम पूर्णपणे बदलतो. त्याच कालावधीत केवळ ₹1 कोटीऐवजी साधारण ₹2.5 ते ₹3 कोटींचा कॉर्पस तयार होऊ शकतो.

इथे जादू SIP वर मिळण्याऱ्या रिटर्नमध्ये नाही, तर शिस्तीत आहे. गुंतवणूक वाढली की compounding खऱ्या अर्थाने काम करायला सुरुवात करते.

संपत्ती निर्माणाचा खरा नियम

दीर्घकालीन गुंतवणूक ही केवळ वेळेवर अवलंबून नसते. ती तीन गोष्टींच्या संतुलनावर अवलंबून असते — उत्पन्न वाढ, महागाई आणि वाढणारी गुंतवणूक. फक्त सातत्य तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचवतं. पण वाढती गुंतवणूक तुम्हाला समाधान देणारी संपत्ती तयार करून देते. म्हणून कमाई वाढली की SIP रक्कम वाढवा.

वाचा: भारतीय म्युच्युअल फंड उद्योग ₹81 लाख कोटी पार – बाजार अस्थिर तरी गुंतवणूक स्थिर?

Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully before investing.

Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top